फुलंब्री पं. स. उपसभापती अश्विनी सोनवणे कार्यकर्त्यांसह भाजपत दाखल

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी): फुलंब्री पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे व मा. जि. प. सदस्य गंगाधर पाटील सोनवणे यांनी गुरुवारी (दि.९) रोजी खामगाव गोरक्ष येथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , आमदार अनुराधा अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातून भाजप पक्षात प्रवेश केला.

अश्विनी सोनवणे यांनी बाबरा जि. प. गटातील खामगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षातून निवडून लढविली होती. भाजपच्या साथीने उपसभापती पद मिळविल्यानंतर त्यांनी बुधवारी खामगाव येथे आपल्या कार्यकर्त्यासह भाजपत प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. सदस्य गंगाधर पाटील सोनवणे, भिकु शेख, मधुकर खामगावकर, वसंतराव जोगदंड, महेमूद शेख, रोहिदास राजाराम सोनवणे, खी नामदेव सोनवणे, साईनाथ विठ्ठल
सोनवणे, रमेश धनजी राकडे, सोमनाथ रंगनाथ सोनवणे, किशोर कैलास जाधव, फईन शेख, विकी गायकवाड, हुजैफा शेख, कैलास एकनाथ सोनवणे, आजिनाथ रंगनाथ सोनवणे, साईनाथ सर्जे राव सोनवणे, पंडित जयाजी सोनवणे, निलेश मिरगे, ज्ञानेश्वर सोनवणे, कृष्णा गंगाधरराव सोनवणे, आजिनाथ गंगाधरराव सोनवणे, संतोष रंगनाथ सोनवणे व इतरांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी जिप उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, पं स. सभापती सर्जेराव मेटे, जिप सदस्य सुरेश बनकर, आदी भाजपाचे व मान्यवरांच्या गोपाळ वाघ, ज्ञानेश्वर मोठे पदाधिकारी उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला आहे. फुलंब्री पं स. उपसभापती अश्विनी सोनवणे यांनी बुधवारी आपल्या कार्यकर्त्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.